मेट्रोच्या कामामुळे महामार्ग वाहतूक कोंडीने “ब्लॉक’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचा मार्ग दापोडी ते निगडी दरम्यान आहे. या मार्गावर मेट्रोचे पिलर व स्पॅनर टाकण्याचे काम ठिकठिकाणी सुरु असल्याने रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेटस्‌ लावण्यात आलेले आहेत. यामुळे, रस्ता अरुंद झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागत आहेत. या कोंडीमुळे विद्यार्थी व नोकरवर्गांना अनेकदा शाळेच्या व कार्यालयीन वेळेत पोचण्यास अशक्‍य होत आहे. वाहतूक कोंडी हटविण्यासाठी मेट्रोने अनेक उपाययोजना करुनही त्या फोल ठरल्याचे पहायला मिळत आहे.

शहरातील निगडी ते दापोडी मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. या कामामुळे पुणे-मुंबई महामार्गावर होणाऱ्या कोंडीने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. तसेच, सततच्या कोंडीने चालकांमध्ये अनेकदा वादाचे प्रसंग घडतात. त्यामुळे, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मेट्रोच्या कामाचा परिणाम शहरातील वाहतुकीवर झाला असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये, गेल्या चार महिन्यापूर्वी बीआरटी मार्ग सुरु झाला असून दापोडी ते चिंचवड पर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. या दरम्यान असणाऱ्या बहुतांशी चौकात वाहतुक कोंडी होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी येथील मोरवाडी चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सिग्नलच्या दोन्ही बाजूने रस्ता अरुंद झाला आहे. या ठिकाणी एकाच लेनमध्ये वाहने चालवत असून चौकामध्ये रिक्षा अनधिकृतपणे उभ्या असतात. यामुळे, इतर वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी सिग्नलच्या मागील बाजूस वाहनांच्या रांगा लागत आहेत. तसेच, सिग्नल सुरू झाल्याने विरुध्द बाजूने येणारे वाहनचालक जोरात वाहने घेऊन येत असल्याने एका लेनमध्ये वाहतूक सुरू असल्याने किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मार्शल नेमण्याबरोबरच कमीतकमी वाहतूक कोंडी होईल, यासाठी मेट्रोने अनेक उपाययोजना केल्या. मात्र, त्या अयशस्वी ठरल्याने दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीवरुन पहायला मिळत आहे. यामुळे, मेट्रोचे काम लवकर पूर्ण केल्यास नागरिकांचा त्रास कमी होणार आहे.

रुग्णवाहिका, “व्हीआयपी’ ताफ्यालाही फटका
मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने एखादी रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकत असल्याचे अनेक प्रसंग उद्‌भवत आहेत. या कोंडीतून रुग्णवाहिका काढताना चालकांची दमछाक होत आहे. तसेच, रस्ता अरुंद असल्यामुळे रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी इतर वाहनचालकांना रस्ता देता येत नाही. विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. अनेक शाळेच्या बस, “व्हीआयपीं’चा ताफा पुढे नेण्यासाठी पोलिसांनाही कसरत करावी लागत आहे. अनेकदा शाळेच्या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीमुळे शहरातील अनेक शाळांमध्ये शाळा भरल्यानंतर प्रवेशद्वार बंद केले जाते. त्यामुळे, विद्यार्थ्यांना उशीर झाल्यानंतर शाळेत प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)