मेट्रोचे रात्रीचे काम रखडणार?

निरीची अहवाल न्यायालयात सादर


मेट्रोचे काम रहिवाशांचा रक्तदाब, चिंता वाढवणारा


मर्यादेपेक्षा आवाजाची पातळी जास्तच

मुंबई – मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या आवाजाची पातळी ही मर्यादेपेक्षा जास्तच आहे. या आवाजामुळे जवळपासच्या रहिवाशांची आधीच डोकेदुखी वाढली असताना आता शारीरिक आजारपणातही भर पडत आहे.

या कामामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून हा आवाज रक्तदाब, मनावरील ताण आणि चिंता वाढवणारा असल्याचा अहवालच निरीने न्यायालयात सादर केला. यामुळे रात्रीच्या वेळी मेट्रोचे रात्रीचे काम रखडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डिसेंबर 2017 मध्ये ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावर दक्षिण मुंबईत रात्रीच्या वेळी मेट्रोचे काम करण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी उठवावी, अशी विनंती करणारा अर्ज मेट्रो प्रशासनाने उच्च न्यायालयात केला आहे. तर त्यावर मुंबईतील स्थानिक नागरीक रॉबीन जयसिंघानी यांनी आक्षेप घेतला आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी निरी (नॅशनल एन्वायरोमेंटल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्युट) या संस्थेने गेली आठ दिवस दक्षिण मुंबईत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. न्यायालयाने हा अहवाल स्विकारून याचिकेची सुनावणी 13 ऑगस्टपर्यंत तहकूब ठेवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)