मेट्रोकडून खर्च वसूल करणार

असमन्वयाचा फटका नागरिकांना
महामेट्रो आणि महापालिका यांच्या समन्वय नसल्याचा फटका अशा घटनांमुळे नागरिकांना बसत आहे. वास्तविक, या रस्त्यावर प्रमुख जलवाहिन्या तसेच ड्रेनेजवाहिन्या असल्याने आधी त्याकडे लक्ष देऊन खोदकाम होणे आवश्‍यक आहे. यासाठी महापालिका आणि मेट्रोचे अधिकारी अशा कामांवेळी उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. तसेच प्रत्येक खोदकामापूर्वी जमिनीखालील सेवा वाहिन्यांची माहिती घेऊनच काम होणे आवश्‍यक आहे. मात्र, या दोन्ही विभागांमध्ये समन्वंय नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत.

महापालिकेची भूमिका : पौंड रस्त्यावर जलवाहिनी फुटल्याचे प्रकरण

दुरूस्तीसह वाया गेलेल्या पाण्याचा खर्च घेणार

पुणे – महामेट्रो कंपनीला पौड रस्त्यावरील भूमिगत जलवाहिन्यांचे नकाशे दिल आहेत. तरीही चुकीच्या पध्दतीने कामामुळे येथील जलवाहिनी फुटल्याचे सांगत, या जलवाहिनी दुरूस्तीचा तसेच वाया गेलेल्या पाण्याचा खर्च महामेट्रोकडून वसूल करण्यात येणार आहे, अशी भूमिका महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने घेतली आहे. तसेच रविवारी सकाळी या भागातील पाणी पुरवठा नियमितपणे सुरळीत करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

महामेट्रोकडून वनाज ते रामवाडी या मार्गाचे काम सुरू असताना; जेसीबीचा धक्का लागून महापालिकेची जलवाहिनी शुक्रवारी सायंकाळी फुटली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही जलवाहिनी दुरूस्तीचे काम सुरू होते. दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर महापालिकेच्या प्रमुख जलवाहिन्या आहेत. त्यामुळे त्यांचे ठिकाण तसेच नकाशे या पूर्वीच महामेट्रोला देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्याकडून भूमिगत जलवाहिन्या तसेच सांडपाणी वाहिन्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. मात्र, ती घेतली जात नसल्याचे चित्र आहे. हे काम सुरू झालेले असून वारंवार हे प्रकार घडत आहे. त्याच्या दुरूस्तीचा खर्च महापालिकेस उचलावा लागत असून नागरिकांनाही मन:स्ताप होत आहे. तसेच मोठया प्रमाणात पाणीसुध्दा वाया जात आहे. ही बाब लक्षात घेऊन या पुढे असे प्रकार घडू नयेत, यासाठी शुक्रवारी फुटलेल्या जलवाहीनीच्या दुरूस्तीचा खर्च तसेच वाया गेलेल्या पाण्याचा खर्च महामेट्रोकडून वसूल करण्यात येणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)