मेजर शशीधरन नायर यांना अखेरची मानवंदना

-भारतमातेच्या वीरपुत्राला आदरांजली : आज अंत्यसंस्कार
– शुक्रवारी सायंकाळी कुटुंबीयांशी झाला होता संपर्क
– वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी देशासाठी बलिदान

पुणे – “भारत माता की जय’, “मेजर नायर अमर रहे’ अशा घोषणा देत लष्करी इतमामात मेजर शशीधरन नायर यांचे पार्थिव पुण्याच्या नॅशनल वॉर मेमोरिअल येथे सायंकाळी सव्वासहा वाजेदरम्यान आणण्यात आले. या ठिकाणी मेजर नायर यांना लष्करी मानवंदना देण्यात आली. यावेळी लष्करी अधिकाऱ्यांसह मेजर नायर यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होता. भारतमातेच्या या वीरपुत्राला आदरांजली वाहताना त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांना अश्रु अनावर झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जम्मू-काश्‍मीर येथील राजौरी येथे शुक्रवारी झालेल्या दहशतवादी स्फोटात मेजर नायर शहीद झाले. पुण्यातील खडकवासला परिसरातील सोनल अपार्टमेंट येथे राहणारे मेजर नायर हे दि. 2जानेवारी रोजी रजा संपवून कर्तव्यावर परतले होते. शुक्रवारी सकाळी त्यांचे कुटुंबीयांशी बोलणेही झाले. पण, संध्याकाळी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटात मेजर नायर शहीद झाले आणि पुण्यात राहणाऱ्या नायर कुटुंबावर आणि ते राहत असलेल्या सोसायटीसह पुणेकरांवर सध्या शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शशीधरनच्या आठवणींने त्यांच्या आप्तस्वकीयांचे डोळे पाणावले होते.

मेजर नायर यांचे कुटुंबीय गेल्या 35 वर्षांपासून खडकवासला परिसरात वास्तव्यास होते. मेजर शशीधरन यांचे वडील विजय नायर यांचे 9 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. ते पुण्यातील सीडब्लूपीआरएस या संस्थेत कार्यरत होते. तर मेजर नायर यांची आई लता या शिक्षिका असून अजूनही क्‍लासेस घेतात. त्यांच्या पश्‍चात पत्नी तृप्ती आणि बहीण असा परिवार आहे. मेजर नायर यांच्यावर रविवारी (दि.13) सकाळी दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)