मेजर शशीधरन नायर, अमर रहें…

भारतमातेच्या सुपुत्रावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार


लष्कर आणि पोलिसांतर्फे संयुक्‍त मानवंदना


“भारत माता की जय’च्या घोषणेत अखेरचा निरोप

पुणे – शहीद मेजर शशीधरन नायर यांच्यावर रविवारी (दि.13) वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी लष्कर आणि पोलिसांतर्फे त्यांना संयुक्‍त मानवंदना देण्यात. देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या मेजर शशीधरन यांना अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

जम्मू येथील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्‍टर येथे शुक्रवारी झालेल्या स्फोटात मेजर नायर शहीद झाले होते. शनिवारी त्यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात आले. राष्ट्रीय युद्धस्मारक येथे लष्करातर्फे त्यांना मानवंदना देऊन आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव खडकवासला येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी 7 वाजता मेजर नायर यांचे पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते. याठिकाणी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, आमदार भीमराव तापकीर, तहसीलदार सुनील कोळी, पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड, हवेलीचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, खडकवासला सरपंच सौरभ मते, त्रिशक्ती माजी सैनिक संघटनेचे मधुकर पायगुडे, माजी सैनिक नानाभाऊ मते, बाळकृष्ण मते, ज्ञानेश्‍वर खानेकर, मधुकर खिरीड, रुपाली चाकणकर, सुरेखा दमिष्टे, जिल्हा परिषद सदस्य जयश्री पोकळे, बाळासाहेब नवले, अशोक मते, ऋषिकेश मते किरकटवाडीचे सरपंच गोकुळ करंजावणे यांच्या शेकडो नागरिकांनी मेजर नायर यांना आदरांजली वाहिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर, सकाळी साडेदहा वाजता त्यांचे पार्थिव वैकुंठ स्माशानभूमी येथे आणण्यात आले. दुचाकीवरून तिरंगा घेतलेली मुले या अंत्ययात्रेच्या पुढे होती. खडकवासला ते नांदेड असे दोन किलोमीटर नागरिक पायी चालत आले. यावेळी “मेजर शशिधरन अमर रहे,’ “भारत माता की जय,’ अशा घोषणा देण्यात आल्या. अंत्ययात्रा जात असताना परिसरातील नागरिकांनी दुकाने बंद ठेवली होती. अंत्ययात्रा जात असताना पानशेत रस्त्यावरील वाहतूक सकाळी 10 वाजेपर्यंत बंद ठेवली होती.

वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांना लष्कर आणि पोलिसांतर्फे संयुक्त मानवंदना देण्यात आली. यावेळी खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, लष्करी अधिकाऱ्यांनी मेजर नायर यांना श्रद्धांजली अर्पण केली, तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर नायर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)