मेघालयात निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या ११५ सदस्यांचा तडकाफडकी राजीनामा

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा राज्यात होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच जाहीर केला. यानंतर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र, मेघालयात काँग्रेससाठी एक झटका बसला आहे. कारण, तिकीट वाटपावरुन मेघालयातील ११५ काँग्रेस सदस्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे  काँग्रेस पुढे नवीन संकट उभे राहिले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यात चोकपोट विधानसभा क्षेत्रात जवळपास १०० सदस्यांनी लाजारुस संगमा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. तर, भोई जिल्ह्यात जिरांग विधानसभा क्षेत्रात तिकीट वाटपावरुन नाराज झालेल्या १५ सदस्यांनी राजीनामा दिला आहे.
मेघालयात २७ फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार आहेत आणि मतमोजणी तीन मार्च रोजी होणार आहेत. ६० सदस्यांच्या मेघालय विधानसभेचा कार्यकाळ सहा मार्च रोजी संपत आहे. मेघालयमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची सुरुवात मंगळवारी पक्षाध्यक्ष राहुल गांधी करतील. या दरम्यान राहुल गांधी पक्षातील नेते आणि इतर संघटना, संस्थांच्या अध्यक्षांसोबत चर्चा करतील.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)