मेघालयात जंगली हत्तींनी केली अनेक घरे उध्वस्त

तुरा – मेघालयातील एका गावात जंगली हत्तींनी धुडगूस घातून ग्रामस्थांचे अतोनात नुकसान केले असून तीन घरेही या हत्तींनी उध्वस्त केली आहेत. नॉर्थ गॅरो हिल्स जिल्ह्यातील बेकबेकग्रे या गावात काल संध्याकाळी हा प्रकार घडला.
बेकबेकग्रे गावचा परिसर हा घनदाट जंगलांचा आणि पर्वतीय परिसर आहे. गावाजवळचा भाग हा हत्तींसाठीचे अभयारण्य म्हणून ओळखला जातो, त्यामुळे येथे जंगली हत्तींचा नेहमीच वावर असतो. काल संध्याकाळी अचानक काही हत्तींनी धुडगूस घालायला सुरुवात केली आणि त्यात ग्रामस्थांची शेतीबरोबरच घरांवर हल्ला चढवला. यात तीन घरे त्यांनी पूर्णपणे उध्वस्त केली. याची माहिती ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी पोहोचले; त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या हत्तींना पिटाळून लावण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतरच या हत्तींनी येथून काढता पाय घेतला. या प्रकारानंतर ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र जागूनच काढावी लागली. गेल्या आठवड्याभरात 40 पेक्षा जास्त हत्तींचा कळप या गावाभोवती भटकत असल्याचे बापून संगमा नामक एका ग्रामस्थाने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)