शिलॉंग – मिझोराम मधील कॉंग्रेस नेते डी. डी. लपांग यांनी कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षात ज्येष्ठ नेत्यांना पद्धतशीरपणे बाजुला काढले जात आहे असा आरोप करीत त्यांनी राजीनामा दिला आहे. लपांग हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि तब्बल पाच वेळा त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे.

पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की आमच्या सारख्या ज्येष्ठांची आता पक्षाला गरज नाही असे सध्याच्या धोरणावरून दिसून येत असून त्यामुळेच आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपले हे राजीनामा पत्र प्रसार माध्यमांनाही दिले आहे. दरम्यान लपांग हे स्वत:च पक्षाच्या कार्यातून निवृत्त झाल्या सारखी स्थिती होती.

गेल्या तीन वर्षात ते आपल्याला भेटलेलेही नाहीत असे अखिल भारतीय कॉंग्रेसचे मिझोरामचे प्रभारी लुईझिन्हो फालेरो यांनी म्हटले आहे. ते गेल्या वर्षापर्यंत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते त्यानंतर त्यांनी राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवले होते. प्रदेशाध्यक्ष लिंगडोह यांनी लपांग यांच्या निर्णयाबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले असून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)