मेघालयतील कोळसा खाणीत 13 कामगार अडकले

संग्रहित छायाचित्र...

मेघालय: मेघालयातील पूर्व भागात असलेल्या एका कोळसा खाणीत 13 कामगार अडकले असून त्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या कोळसा खाणीत पाणी शिरले असून सर्व कामगार त्यात अडकलेले आहेत. कामगारांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. कोळसा खाणीतील पाणी पंपाच्या सहाय्याने बाहेर काढले जात आहे.
ही घटना गुरुवारी सकाळी घडली. याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती देण्यात आली असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफने बचाव कार्य सुरु केले आहे. याप्रकरणी कोळसा खाणीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अडकलेल्या कामगारांची नेमकी काय परिस्थिती आहे यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळसा खाणीत पूर्ण पाणी भरले असल्या कारणाने कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता आहे. 2014 मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने धोकादायक बेकायदेशीर कोळसा खाणींच्या उत्खननावर बंदी आणली होती. मेघालयात हा प्रकार सर्रासपणे चालतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नोव्हेंबर महिन्यात सामाजिक कार्यकर्ता ऍग्नेस यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानंतरही सुरु असलेल्या खाणींविरोधात आवाज उठवला होता. अशा खाणींची माहिती मिळवत असताना ऍग्नेस आणि त्यांची सहकारी अमित संगमा यांच्यावर हल्ला झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)