मेघन मर्केलच्या वडिलांनी केली राजघराण्यावर टीका

राजघराण्यातील गुप्ततेची सायंटोलॉजी पंथाशी तुलना

लंडन – ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी यांच्या पत्नी मेघन मर्केल यांच्या वडिलांनी ब्रिटनच्या राजघराण्यावर जोरदार टीका केली आहे. थॉमस मर्केल यांनी राजघराण्यातील गोपनीयतेची तुलना बंडासाठी पाळल्या जाणाऱ्या गुप्ततेशी केली आहे. मेघन मर्केल आणि प्रिन्स हॅरी यांचा विवाह झाल्यापासून आपल्या कन्येबरोबरचे नाते तोडल्याबद्दल थॉमस मर्केल यांनी यापूर्वीही राजघराण्यावर टीका केली होती. राजघराण्याने सायंटोलॉजी सारख्या पंथाबरोबर गुप्तपणे हातमिळवणी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मेक्‍सिकोमधील रोसारितो येथील निवासस्थानी असलेल्या थॉमस मर्केल हे हॉलिवूडमधील माजी दिग्दर्शक आहेत. ब्रिटनमधील राजघराणे हे एकतर सायंटोलॉजिस्ट किंवा स्टेपफोर्ड कुटुंब असावे. “स्टेपफोर्ड वाईव्हज’ या हालिवूडमधील प्रसिद्ध भयपटातील कुटुंबही तसेच कोणात न मिसळणारे होते. त्यांना कोणताही प्रश्‍न विचारला जाऊ शकत नाही. जर विचारला तरी ते उत्तरेही देत नाहीत. ब्रिटनच्या राजघराण्याने या कोषातून बाहेर पडून बोलायला पाहिजे, अशी अपेक्षा थॉमस मर्केल यांनी व्यक्‍त केली आहे.

आपली कन्या मेघन आणि तिचे पती प्रिन्स हॅरी यांच्याशी संपर्क साधण्याचा आपण तीन महिन्यांपासून प्रयत्न करत आहोत. विवाहानंतर हे दाम्पत्य आपल्याशी एकदाही बोललेले नाही, असेही ते म्हणाले. मेघन आणि प्रिन्स यांच्या विवाहाला प्रकृतीअस्वास्थ्यामुले ते उपस्थित राहू शकलेले नव्हते.

आत्ममग्न राहणाऱ्यांचा पंथ
सायंटोलॉली हा आत्ममग्न राहणाऱ्यांचा अमेरिकेतील पंथ आहे. अमेरिकेतील लेखक रॉन होबार्ड यांनी या पंथाची सुरुवात केली होती. हे लोक स्वतःबाबत काहीही बोलत नाहीत. त्यांच्याबाबत कोणीही काहीही बोलत असेल, तर घराचे दरवाजे बंद करून घेतात. कान बंद करतात, पण बोलत नाहीत. सायंटोलॉजीच्या चर्चमध्ये टॉम क्रूझ सारख्या प्रसिद्ध अभिनेत्याला प्रवेश नाकारला गेला होता. याच टॉम क्रूझने चर्चसाठी मोठी देणगीही दिली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)