मेक अप करणाऱ्या स्त्रिया मूर्ख नसतात- ऐश्‍वर्या

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्‍वर्याचा लुक जेवढा गाजतो आहे, तेवढीच तिने मिडीयाशी केलेली बातचीतही खूप गाजत आहेत. खूप जास्त सिनेमे न करण्याचे करण विचारल्यावर आता आपण आई असल्याने जास्ती सिनेमे करणे शक्‍य नसल्याचे तिने सांगितले. तसेच मेकअप करणाऱ्या स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलायला पाहिजे, असेही ती म्हणाली.

मेकअप करणाऱ्या स्त्रियांना समाजात मूर्ख समजले जाते. मात्र या विचारातून समाजाने बाहेर पडायला पाहिजे. आपण एकमेकांना जज करणे थांबवले पाहिजे. स्त्रिया मेक अप करतात याचा अर्थ त्या मूर्ख असतात किंवा त्यांच्यामध्ये संवेदनशीलतेचा अभाव असतो, असे मानता कामा नये असे ऐश्‍वर्या म्हणाली. जर स्त्रिया जर मेक अप करत नसतील तर त्यांना इतरांमध्ये रस नसतो किंवा त्यांना जरा जास्तच अक्कल असते, असेही समजण्याची गरज नसल्याचेही ती म्हणाली.

कानमध्ये ऐश्‍वर्याच्या डिजाईन आऊटफिट, फ्रेश स्टाईल आणि ऍटिट्युडने सगळ्यांनाच इंप्रेस केले आहे. ऐश गेल्या 17 वर्षांपासून कानच्या रेड कार्पेटवर हजेरी लावते आहे. सध्या ऐश्‍वर्या “फन्ने खान’मध्ये काम करते आहे. मात्र या सिनेमाचे प्रॉडक्‍शन हाऊस “क्रिअर्स प्रॉडक्‍शन’चे दिवाळे वाजले आहे. त्यामुळेच सध्या या सिनेमाचे शुटिंग थांबले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)