मेक्‍सिकोत निवडणूक नामांकन ते प्रचार समाप्तीपर्यंत 133 नेत्यांची हत्या

मेक्‍सिको – मेक्‍सिकोमध्ये निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार आहे.मात्र निवडणुकीसाठी नामांकनाच्या दिवसापासून ते प्रचार समाप्तीपर्यंत एकूण 133 नेत्यांची हत्या करण्यात आल्याच्या एका अहवालाने जग हादरले आहे. एटेलेक्‍ट नावाच्या सल्लागार संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानंतर हा अहवाल सादर केला आहे. संस्थेने दिलेल्या अहवालनुसार मेक्‍सिकोत हिंसाचार वाढत्या प्रमाणावर आहे.

राजकारणावरही हिंसाचाराचे सावट पडलेले आहे. निवडणुकीसाठी नामांकन करण्याच्या दिवसापासून ते प्रचार समाप्तीच्या दिवसापर्यंतचा अभ्यास या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. त्यानंतर अलीकडेच पश्‍चिमेकडील मिकोआकेनच्या मेयरची हत्या करण्यात आलेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हत्या करण्यात आलेल्या नेत्यांपैकी 48 जण निवडणूक लढवत होते. त्यापैकी 28 जणांची हत्या प्राथमिक प्रचारादरम्यान आणि 20 जणांची हत्या सार्वजनिक प्रचारादरम्यान करण्यात आलेली आहे. स्थानिक पातळीवर हिंसाचार मोठ्या प्रमाणावर असून किमान 71 टक्के हल्ले निर्वाचित अधिकारी आणि स्थानिक पातळीवर निवडणूक लढवण्याऱ्या उमेदवारांवर झालेले आहेत. या वर्षीच्या निवडणुका या आजवरच्या सर्वाधिक हिंसक निवडणुका असल्याचे एटेलेक्‍टचे अध्यक्ष रुबेन सालाझार यांनी म्हटले आहे.

सन 2006 साली मेक्‍सिको सरकारने मादक द्रव्यांच्या तस्करीविरुद्ध लष्कर तैनात केल्यापासून देशातील हिंसाचारात प्रचंड वाढ झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)