मेक्‍सिकोतील दाम्पत्याकडून दहा महिलांची हत्या 

मेक्‍सिको:  मेक्‍सिकोतील एका दाम्पत्याला दहा महिलांच्या हत्येच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. यातील एका मृत महिलेच्या मुलाला त्यांनी विकल्याचा गुन्हाही त्यांच्या विरोधात लावण्यात आला आहे. त्यांच्या अटकेनंतर मेक्‍सिकोमधील महिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या हत्या प्रकरणाचा छडा लागला आहे.
पोलिसांना या दाम्पत्यावर पहिल्यापासूनच संशय होता. त्यांनी त्यांच्या घरावर सातत्याने पाळत ठेवली होती. गुरूवारी एका लहान बाळाला घरातून ते बाहेर घेऊन जात असताना त्यांना अटक करण्यात आली हे. हे बाळ ज्या महिलेचे होते त्या महिलेचीही त्यांनी हत्या केल्याची बाब उघड झाली आहे. त्यांनी ठार केलेल्या महिलांच्या शरीराचे तुकडेतुकडे करून ते जवळच्याच मोकळ्या प्लॉट मध्ये टाकून दिलेले आढळून आले आहेत.
या दाम्पत्याने आपण दहा महिलांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तथापी त्यांच्याकडून आणखीही काही महिलांची हत्या झाली असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यांनी या महिलांचे मृतदेह जिथे टाकून दिले आहेत त्या ठिकाणांचा कसून शोध घेतला जात आहे. मेक्‍सिको मध्ये मानवी तस्करीचे प्रमाण अलिकडच्या काळात खूप वाढले आहे. एका स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार तेथे रोज किमान चार लहाने बेपत्ता होत आहेत. त्यातच आता महिलांचेही अपहरण करून त्यांची तस्करी केली जात असावी असा पोलिसांचा कयास होता पण तशातच हे खूनी दाम्पत्य सापडल्याने या साऱ्या प्रकरणाचा उलगडा लवकरच होईल असे सांगण्यात येते

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)