मेकुनू चक्रिवादळाचा ओमान आणि येमेनला तडाखा

सलालाह (ओमान) – “मेकुनू’ या चक्रिवादळाचा आज अरेबियातील द्विपकल्पातील ओमान आणि येमेनला तडाखा बसला. या चक्रिवादळामुळे किमान 3 जण ठार तर 40 जण बेपत्ता झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ओमानमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या सलालाहमधील मोठ्या भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. तर अरबी समुद्रामध्ये मोठ्या लाटा उसळू लागल्या आणि समुद्रकिनाऱ्यावरच्या पर्यटकांची भंबेरी उडाली.

मेकुनू चक्रिवादळामुळे ओमानमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे, तर येमेनमधील सोकोत्रा येथून 40 जण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये येमेनी, भारतीय आणि सुदानी नागरिकांचा समावेश आहे. या पैकी काहींचा चक्रिवादळात मृत्यू झाल्याची भीती अधिकारी व्यक्‍त करत आहेत. सलालाह शहरामध्ये अनेक ठिकाणी झाडे आणि वीजेचे खांब कोसळले आहेत. तर अनेक भुयारी मार्गांमध्ये नागरिकांनी सुरक्षित आश्रय घेतला आहे. वाहने रस्त्यांवरच सोडून नागरिकांनी सुरक्षित आश्रय शोधला आहे. या चक्रिवादळामुळे ताशी 170 ते 180 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्‍यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)