मेंढ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकाचा मृत्यू

रेल्वेची धडक बसून 25 मेंढ्याचा चेंदामेंदा

श्रीरामपूर – रेल्वेखाली जाणाऱ्या मेंढ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकाचा रेल्वेची धडक बसून मृत्यू झाला. यावेळी कळपातील सुमारे 25 मेंढ्याचाही मृत्यू झाला. दौंड – मनमाड रेल्वे महामार्गावर औद्योगिक वसाहतीजवळ आज सकाळी सव्वा अकरा वाजता झेलम एक्‍स्प्रेसखाली ही दुर्घटना घडली. उशिरापर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. ही व्यक्ती मेंढपाळ आहे की नाही हे देखील समजू शकलेले नाही.
तुषार गोरक्षनाथ पारखे यांच्या मालकीच्या मेंढ्या दोन महिला औद्योगिक वसाहतीच्या शिवारात चारण्यासाठी घेवून गेल्या होत्या. रेल्वेरुळ ओलांडताना त्यांच्या पाठोपाठ मेंढ्‌याही निघाल्या. त्याच वेळी मनमाडहून दौंडकडे जाणारी झेलम एक्‍सप्रेस आली. या मेंढ्या रेल्वेखाली येऊ नये यासाठी एक व्यक्ती त्यांना हाकलण्यासाठी आली. त्याने मेंढया रुळावरून हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतू वेगात आलेल्या रेल्वेचा धक्का त्या व्यक्तीला लागला. तसेच सुमारे 25 मेंढ्यांचा चेंदामेंदा झाला. तर काही मेंढया रुळाच्या बाजुला फेकल्या गेल्या.
या ठिकाणाहून जाणाऱ्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांना अज्ञात व्यक्तीच्या डोक्‍याला तसेच हाताला मार लागल्याचे दिसून आले. जखमी अवस्थेत त्याला शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र जगधने यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, हवालदार जे. के. लोंढे, संजय दुधाट यांच्यासह रेल्वे पोलीस व स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करण्यात आला. मृत मेंढ्‌याचे शवविच्छेदन करून औद्योगिक वसाहत परिसरात त्यांना पुरण्यात आले. मेलेल्या मेंढ्‌या या तुषार पारखे (रा. वांगी खिर्डी, हल्ली मुक्काम श्रीरामपूर) यांच्या मालकीच्या असल्याचे समजते. त्यांच्याशी संपर्क साधला असता या मेंढ्‌या आपल्या मालकीच्या असून औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या जागेत अनेक दिवसांपासून त्या पाळल्या आहेत. आपल्याकडील नोकर नवाब कुरेशी यांच्या पत्नीसह एक महिला मेंढ्‌या घेवून गेल्या होत्या. रेल्वे आल्यानंततर अनोळखी व्यक्ती अचानक तेथे आली. त्याने मेंढया हाकलण्याचा प्रयत्न केला. असे त्यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक बहिरट यांनी अपघातात मृत्यू पावलेली व्यक्ती ही मेंढपाळ नाही. त्याची ओळखही पटलेली नाही. मेंढया रेल्वेखाली सापडू नये म्हणून तो मदतीसाठी गेला होता. दुर्दैवाने अपघातात त्याचा मृत्यु झाला. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)