मेंढपाळास मारहाण , 34 हजारांचे दागिने हिसकावले

सुपा येथील कोल्हेवस्ती भागातील घटना
सुपा- पारनेर तालुक्‍यातील सुपा येथील कोल्हेवस्ती शिवारात मेंढपाळास मारहाण करुन 34 हजार 400 रुपयेरकमेचा ऐवज चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना मंगळवारी रात्री घडली.

मेंढपाळ व्यवसाय करणारे गजानन भानुदास टकले (वय 35) कुटुंबासह सुमारे तीन महिन्यांपासून सुपा येथील वाळवणे रस्त्यालगतच्या कोल्हे वस्ती भागात मळगंगा देवीच्या शेजारी राहतात. मंगळवारी रात्री साडेतीन वाजता चार चोरट्यांनी मेंढपाळांच्या पालात प्रवेश करून गजानन यांना लाकडी दांडक्‍यांनी जबर मारहाण केली. चोरट्यांनी गजानन यांच्या पत्नी रंजना यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या दोन पळ्या, डुल चांदीचे जोडवे असा ऐवज हिसकावून पळ काढला. रंजना यांनी आरडाओरडा केल्यानंतर कोल्हे वस्तीवरील ग्रामस्थ घटनास्थळी धावले.

सुपा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता पोलीस उपनिरीक्षक बी. जे. पठाण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)