मेंढपाळांची चारा, पाण्यासाठी भटकंती

सावळ परिसरातील स्थिती : आता स्थलांतरीची आली वेळ

सावळ- सावळ व परिसरात परिसरात सध्या दुष्काळच्या झळा तीव्र झाल्या असल्याने डिसेंबर महिन्यापासूनच पाणीपाणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मेंढीपालन व्यवसाय धोक्‍यात आला असून, मेंढ्यांसाठी पिण्याचे पाणी व चाऱ्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने मेंढपाळांना स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे.
बारामती तालुक्‍यात गेल्या चार-पाच वर्षांपासून समाधानकारक पाऊस न पडल्याने पाण्याची पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. तर दुष्काळामुळे तालुक्‍यातील परिस्थिती दिवसंदिवस भीषण होत आहे. तलाव, विहिरी, कुपनलिका जवळपास पूर्णपणे कोरडे पडले आहेत. तर पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरचा वापर काही भागात करण्यात येत आहे. पण मेंढ्या पाळणाऱ्यांना त्या पाण्याचा उपयोग होत नाही. ओढे, नाले, तलाव कोरडे पडल्याने या भटकणाऱ्या प्राण्यांना पाणी पाजणे कठीण होत चालल्यानेच तालुक्‍यातील मेंढपाळांनी आपल्या मेंढ्यासह स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. दररोज कित्येक मेंढ्यांचे कळप दुसऱ्या जिल्ह्यात किंवा पुणे जिल्ह्याती इतर तालुक्‍यांमध्ये जाता आहेत. पाणी-चाऱ्यासाठी पणी असेल त्या परिसरात आसरा घेणार असल्याचे मेंढपाळांनी सांगितले. ही अतिशय गंभीर बाब असून मुक्‍या प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

  • हे चित्र दुर्दैवी
    बारामतीच्या जिरायती भागात दुष्काळाची भीषणता जास्त पहावयास मिळते. कारण या भागात पावसाचे प्रमाण नेहमीच अत्यल्प असते. त्यात या परिसरात जलशिवरची कामेही शासनाकडून प्रभावीपणे न राबविल्याने या भागातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. भटकंती करणाऱ्याला याची मोठी झळ पोहोचते. या भागात कोणताही आधार शिल्लकच न राहिल्याने स्थलांतर केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही हे ओळखूनच मेंढपाळांनी स्थलांतराचा मार्ग निवडल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
  • चाऱ्याचा प्रश्‍न येणार ऐरणीवर
    पाणी असलेल्या ठिकाणी पाण्याचा प्रश्‍न काही अंशी मिटला असलातरी चाऱ्याचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे दुष्काळ निवारण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे. जर जनावरांसाठी शासन छावण्या उभारणार असेल तर त्यावेळी शेळ्या-मेंढ्याचाही विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)