मेंगडेवाडी सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार

अवसरी- मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री गणेश विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेश सहादू मेंगडे आणि उपाध्यक्षपदी सुरेखा सुभाष दांगट यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपवळसे पाटील यांचे हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. मेंगडेवाडी येथील श्री गणेश विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष रामचंद्र मेंगडे आणि उपाध्यक्ष संगीता मेंगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश मेंगडे आणि उपाध्यक्ष सुरेखा दांगट यांची निवड झाली. यावेळी माजी सरपंच भरत फल्ले, जिजाभाऊ मेंगडे, बाळासाहेब मेंगडे, संजय गोरे, पोपट मेंगडे, भरत मेंगडे, संचालक आनंदराव मेंगडे, शरद मेंगडे, विठ्ठल गावरी, रमेश मेंगडे, बन्सी रणपिसे, धनेश टाव्हरे, नवनाथ कोरके उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए व्ही यंदे आणि सचिव संजय मेंगडे यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)