मेंगडेवाडी येथे जनावरांसाठी लसीकरण

अवसरी – मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे जनावरांसाठी जंतनाशक व लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना विविध रोगांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गवारीमाळा येथे 140 जनावरांना लसीकरण केले गेले.
यावेळी मेंगडेवाडीचे सरपंच शुभांगी गवारी, निलेश गवारी, माजी उपसरपंच मोहन गवारी, डॉ. सुरेश टाव्हरे, सागर वाळुज आणि मॅंनकाईड कंपनीचे गजानन माने समवेत परिसरातील शेतकरी उपस्थित होते. ग्रामीण कृषी कार्यानुभव अंर्तगत महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांनी जतंनाशक औषधे व लसीकरण याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जंतनाशक व विविध रोगांबद्दल माहिती देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने फऱ्या, घटसर्प, लाळखुरकूूद या रोगांबदल माहिती देऊन रोग होऊ नये म्हणून लसीकरण करून घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले गेले. कृषी विज्ञान पदवीच्या कृषिकन्या दर्शना खराबी, देविका भोकसे, प्रज्ञा कांबळे, पूजा फडके, पुनम गवारी, माधुरी गेंगजे, कोमल गोसावी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)