मेंगडेवाडी ग्रामपंचायतीत आरोग्य तपासणी शिबीर

मंचर-आंबेगाव तालुक्‍यातील मेंगडेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावात आरोग्य शिबीर झाले. महिला आणि पुरूषांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच मोफत ब्यूटी पार्लर व मेहंदी कोर्स सुरू करण्यात आले आहे.
मेंगडेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील महिलांसाठी मोफत, ब्यूटी पार्लर व मेहंदी कोर्स सुरू करण्यात आला आहे. याचबरोबर गावातील तीन अंगणवाडीतील मुलांना एकूण 52 हजार रुपये किमतीचे तर गावातील दिव्यांगांना 3 टक्‍के निधीतून 16 हजार 400 रूपये किमतीचे टेबल फॅनचे वाटप सरपंच शुभांगी गवारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच भरत फल्ले, जिजाभाऊ मेंगडे, खरेदी विक्री संघाचे संचालक संजय गोरे, पोपटराव मेंगडे, उपसरपंच दिनेश मेंगडे, ग्रामपंचायत सदस्य विशाल गवारी, रेश्‍मा गवारी, गौरवी मेंगडे, रघुनाथ मेंगडे, शारदा मेंगडे, सुनिता गवारी, ग्रामसेविका ज्योती मोरडे, माजी अध्यक्ष रमेश मेंगडे, संतोष मेंगडे, नितीन गवारी, निलेश गवारी, राघू मेंगडे माजी सरपंच लताताई मेंगडे, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, ग्रामस्थ, महिला, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)