मेंगडेवाडीत शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला

संग्रहित छायाचित्र...

अवसरी-मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथील रणपिसे वस्तीवरील शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करत एक शेळी ठार केली तर एक जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. गेल्या महिन्यापूर्वी मेंगडेवाडी परिसरात पाळीव प्राण्यावर बिबट्याने हल्ला झाल्याच्या दोन तीन घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
मेंगडेवाडी येथील रणपिसेवस्ती वरील शेतकरी देवराम रणपिसे यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करत एक शेळी ठार केली, तर एक जखमी केले असल्याची घटना घडली आहे. बिबट्याने गोठ्यात प्रवेश करत शेळीचे करडू ठार केले. नंतर दुसऱ्या शेळीवर हल्ला केला. गोठ्यात बांधलेल्या गाय-म्हशीचा ओरडण्याचा आवाज आल्यामुळे घरच्यांनी आवाज का येतो, हे जाऊन पाहीले असता बिबट्याने शेळीचे करडू फस्त करून दुसऱ्या शेळीवर हल्ला करीत होता. त्यावेळेस पार्वताबाई रणपिसे यांनी मोठ्याने आरडाओरड केल्याने बिबट्या तेथून निघून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील नीतिन मेंगडे व वनरक्षक मुंडकर यांनी घटनेची पाहणी करून पंचनामा केला आहे. त्यामुळे वनविभागाने या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी मेंगडेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)