मेंगडेवाडीत शिवज्योतीचे स्वागत

मंचर- मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे स्वराज्य युवा प्रतिष्ठाण व शिवछत्रपती प्रतिष्ठाणच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवनेरी ते मेंगडेवाडी या ज्योतीचे ग्रामस्थांनी स्वागत केले. रात्री दहा वाजता किल्ले शिवनेरीवर जाण्यासाठी शिवभक्तांनी प्रस्थान केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणी शिवज्योतीचे प्रज्वलन करुन भगवे ध्वज आकाशात भिरकावत छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी संपूर्ण शिवनेरी गड शिवमय झाला होता. किल्ले शिवनेरी ते मेंगडेवाडी भव्य शिवज्योतीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. मेंगडेवाडीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास झेंडूच्या फुलांची आरास करण्यात आली होती.

कार्यक्रमासाठी स्वराज्य युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुनील गवारी, शिव छत्रपती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गणेश मेंगडे, किशोर चक्कर, मोहन चक्कर, अविनाश मेंगडे, ओंकार गवारी, प्रज्वल गवारी, विवेक मेंगडे, प्रितेश गवारी, मनोज गायकवाड, अक्षय मेंगडे, दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)