मॅरेथॉन धावपटू क्रांती साळवी यांचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याकडून अभिनंदन

मुंबई: ज्येष्ठ वयोगटात जागतिक मॅरेथानमध्ये पारंपरिक नऊवारी साडीत सहभाग घेत ४२.१९५ किलोमीटरचे अंतर अवघ्या 57 मिनिटे 7 सेकंदात पार करणाऱ्या आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या विक्रमाचा ठसा उमटवणाऱ्या क्रांती साळवी यांनी क्रीडामंत्री विनोद तावडे यांची मंत्रालयीन दालनात भेट घेतली. यावेळी क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी साळवी यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार केला तसेच त्यांच्या विक्रमी कामगिरीबद्दल अभिनंदन केले. मॅरेथॉनमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी उपक्रमामध्ये राज्य शासन नक्कीच सहकार्य करेल, असेही तावडे यांनी यावेळी सांगितले.

जर्मनी येथील बर्लिनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जागतिक मॅरेथॉनमध्ये धावपटू क्रांती साळवी (शिंदे) यांनी ज्येष्ठ वयोगटात पारंपरिक नऊवारी परिधान करीत विक्रमी वेळ नोंदविली आहे. या अगोदरही त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. क्रांती यांनी यापूर्वी मुंबईला झालेल्या आयआयटी मॅरेथॉनमध्ये नऊवारी परिधान करून स्पर्धा पूर्ण केली होती. क्रांती साळवी ह्या अनेक नामांकित पदकांच्या मानकरी आहेत. २०१२ मध्ये पहिल्यांदा मुंबई हाफ मॅरेथॉन, मॉरिशस मॅरेथॉन, मिलो मनिला, फिलिपाईन्स मॅरेथॉन अशा अनेक मॅरेथॉनमध्ये धावून त्यांनी पदके मिळविली आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)