मॅन्युअल टायपिंग परीक्षेसाठी 87 हजार अर्ज

पुणे, दि.29 – राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या टंकलेखन व लघुलेखन (शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा) परीक्षा दि. 2 ते 6 जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परीक्षेस राज्यभरातून 87 हजार 699 विद्यार्थी बसले आहेत; तर पूर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या 136 आहे.
राज्यात पारंपरिक पध्दतीने चालणाऱ्या मॅन्युअल टायपिंगबरोबर परिषदेकडून संगणक टायपिंग परीक्षाही घेण्यात येते. मात्र राज्यातील टाईपरायटर व्यावसायिकांच्या उपजिविकेचे एकमेव साधन असल्याने अद्यापही हे मॅन्युअल टायपिंग सुरू ठेवले आहे. 2019 पर्यंत मॅन्युअल टायपिंग राज्यात सुरू राहणार आहे. अद्यापही संगणक टायपिंग बरोबरच मॅन्युअल टायपिंगसाठीही तितकेच विद्यार्थी अर्ज करतात. 2 जुलैपासून यंदा राज्यात मॅन्युअल टायपिंगची परीक्षा सुरू होत आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातून केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. टायपिंगबरोर शॉर्टहॅन्ड परीक्षाही राज्यात होणार असून यासाठी 8 हजार 599 विद्यार्थी शॉर्टहॅंड परीक्षा देणार आहे. यामध्ये 2 हजार 603 पूर्नपरीक्षार्थींचा समावेश आहे. शॉर्ट हॅन्ड हे अनेक सरकारी नोकरीमध्ये अद्यापही आवश्‍यक असून त्याला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही चांगली असल्याचे परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)