मॅन्युअल टंकलेखनाचा अभ्यासक्रम बंद होण्याच्या मार्गावर

अभ्यासक्रमास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ


150 केंद्रांवर एकूण 1 लाख विद्यार्थी देणार परीक्षा

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या 4 ते 8 फेब्रुवारी दरम्यान मॅन्युअल टंकलेखन परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यातील 150 केंद्रांवर एकूण 1 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

राज्यात संगणक व मॅन्युअल टंकलेखनचे शिक्षण देणाऱ्या 3 हजार 500 संस्था कार्यरत आहेत. गेल्या वर्षी मॅन्युअल टंकलेखनच्या परीक्षेला 96 हजार विद्यार्थी बसले होते. यंदा त्यात काही वाढ झालेली आहे. जिल्हा व तालुकास्तरावरील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. दररोज तीन बॅचेस याप्रमाणे सकाळी 9, 11.30 आणि 2 वाजता परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कामकाजात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागलेला आहे. सर्वच विभागात इ-गव्हर्नन्स व इ-ऑफिस पद्धत राबविण्याचे नियोजन शासनाने केलेले आहे. संगणक टंकलेखनचा अभ्यासक्रम सुरू करताना मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आधी 30 नोव्हेंबर, 2015 पर्यंत मॅन्युअल टंकलेखन बंद करण्यात येणार होते. त्यानंतर 31 मे, 2016 पर्यंत त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. पुन्हा 31 मे, 2017 पर्यंत शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली होती.

मॅन्युअल टंकलेखन बंद करण्याच्या शासनाच्या निर्णया विरोधात मुंबई उच्च न्यायालयात काही जणांनी याचिका दाखल केल्या होत्या. शासनाने याचिकाकर्त्यांबरोबर विचारविनिमय करून निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायालयाकडून शासनाला देण्यात आले होते. त्यानुसार शासनाने चर्चा करून आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार येत्या 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंतच मॅन्युअल टंकलेखनाचा अभ्यासक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे. यानंतर पुन्हा मुदतवाढ द्यायची की नाही याबाबत शासनाकडून होणाऱ्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मॅन्युअल टंकलेखन बंद होणार असल्याने अनेक उमेदवारांना धाकधुक लागलेली आहे. बहुसंख्य उमेदवारांनी आधी या परीक्षा दिल्या आहेत. मात्र, त्यात त्यांना यश मिळालेले नाही. त्यामुळे आता मॅन्युअल टंकलेखनाची परीक्षा देण्यासाठी फेब्रुवारी व जुलै अशा दोनच संधी मिळणार आहेत, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)