मॅडम तुसॉ म्युझियममध्ये विराट कोहलीचाही पुतळा

दिल्लीतील संग्रहालयात बसविणार

नवी दिल्ली – मॅडम तुसॉ म्युझियममध्ये जगभरातील विविध क्षेत्रांमधील प्रसिद्ध व्यक्‍तींच्या मेणाच्या प्रतिकृती बसविण्यात येतात. लंडनमध्ये मुख्य म्युझियम असलेल्या या संग्रहालयाच्या जगभरातील अन्य प्रमुख शहरांमध्येही शाखा आहेत. भारतात दिल्लीत असलेल्या मॅडम तुसॉ म्युझियममध्ये आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या पुतळ्याची भर पडणार आहे.

या संग्रहालयात विराटबरोबरच सचिन तेंडुलकर, कपिल देव व लियोनेल मेस्सी या अन्य क्रीडापटूंचेही पुतळे आहेत. 2006 मध्ये कारकिर्दीला प्रारंभ केल्यापासून विराट कोहलीने एकामागून एक लक्ष्यांचा यशस्वी पाठलाग करीत अल्पावधीत क्रिकेटविश्‍वात मानाचे स्थान मिळविले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 19 वर्षांखालील विश्‍वचषकही जिंकला.

क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या विराटवर अर्जुन पुरस्कार, आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू, तसेच बीसीसीआयचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अशा अनेक पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. मॅडम तुसॉ म्युझियममध्ये आपल्या पुतळ्याचा समावेश होणे हा बहुमान असल्याचे सांगून विराटने “टीम तुसॉ’ला धन्यवाद दिले.
त्याच वेळी भारतीय क्रीडाशौकिनांच्या हृदयात मानाचे स्थान मिळविणाऱ्या विराटच्या पुतळ्याचा समावेश करताना आम्हाला अभिमान वाटत असल्याचे मॅडम तुसॉ म्युझियमची व्यवस्था पाहणाऱ्या मर्लिन एन्टरटेनमेंट्‌सचे संचालक अंशुल जैन यांनी सांगितले. बॉलीवूड, हॉलीवूड व क्रीडाक्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असलेल्या या संग्रहालयात विराटचा पुतळा हे 23वे आकर्षण ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)