मॅजीक बस इंडियाने ग्रामीण शाळांमध्ये काम करावे

  • म्हस्के ः सासवडमध्ये युथ लीडर गुणगौरव कार्यक्रम

जेजुरी – शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मिळत नाहीत. मॅजिक बस इंडिया फाउंडेशनने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना सर्वांगिन विकासासाठी काम करावे, असे आवाहन पुरंदर तालुका पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के यांनी केले.
मॅजीक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात सोमवार (दि. 26) युथ लीडर गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अतुल म्हस्के होते. यावेळी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य नंदकुमार सागर, तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष नितीन राउत, फाउंडेशनचे जिल्हा प्रमुख पराग येवले, तालुका प्रमीख शरण खंडू तसेच तालुक्‍यातील विविध विद्यालयातील मुख्याध्यापक-शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. फाउंडेशन पुरंदरच्या वतीने तालुक्‍यातील सुमारे शंभर प्राथमिक व माध्यमिक विद्यालायातील साडे नऊ हजार विद्यार्थ्यांना खेळ, शिक्षण, आरोग्य स्त्री-पुरुष समानता, भावनात्मक विकास रुजविण्यासाठी कार्य करत आहे. 19 मार्गदर्शक व 380 स्वयंसेवक प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. या वर्षी या फाउंडशेनच्या माध्यमातून 107 विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुमारे आठ लाख रुपयांचे शूजचे वाटप करण्यात आले. खोखो कब्बडी व क्रिकेट या खेळांचे मार्गदर्शन शिबीर भरवून तालुका व जिल्हास्तरावर स्पर्धा घेऊन विद्यार्थ्याना प्रोत्साहन देण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे संदीप जगताप यांनी सांगितले. यावेळी फाउंडेशनचे उत्कृष्ट युथ लीडर अंकिता सणस, आदेश पवार, योगेश दोडके, अक्षय जगताप, कोमल जगताप, धनश्री दरेकर यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक पराग येवले यांनी केले. सूत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले तर, आकाश शिळीमकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रतिक जोशी, हर्षाली कुंभारकर, श्रीधर भोसले यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)