मॅक्‍सवेलचे अपयश अनपेक्षित – रिकी पॉन्टिंग

तर यावेळी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्‍सवेलच्या अपयशाबद्दल पॉन्टिंग म्हणाला की, मॅक्‍सवेलला यंदाच्या सत्रात कोणत्या कारणाने अपयश आले हे मला खरोखरीच समजत नाही. मॅक्‍सवेल हा उत्कृष्ट फलंदाज असून त्याने अनेक वेळा आपल्या संघाला एकहाती सामने जिंकून दिले आहेत. मात्र यंदा त्याच्या फलंदाजीला कोणते ग्रहण लागले होते हे कळत नाही. दिल्लीच्या संघाने आपल्या 14 पैकी 12 सामन्यांमध्ये मॅक्‍सवेलला खेळण्याची संधी दिली होती मात्र या सर्व सामन्यांमध्ये मिळून त्याला 14.08 च्या सरासरीने फक्त 169 धावाच करता आल्या, ज्यात त्याला केवळ तीनदा दोन आकडी धावा करता आल्या आहेत. कॉलिन मन्‍रो आणि जेसन रॉय यांच्या ऐवजी मॅक्‍सवेलला अपयशी ठरत असतानाही 12 सामन्यांमध्ये का खेळवले, असे विचारल्यावर पॉन्टिंग म्हणाला की, मॅक्‍सवेलचा स्पर्धेपूर्वीचा फॉर्म पाहता तो आमच्यासाठी विजय मिळवून देणारा खेळाडू ठरू शकेल अशी आम्हाला आशा होती.

आम्ही मॅक्‍सवेलला चौथ्या स्थानावर खेळवणार होतो. पण मॅक्‍सवेलच्या अनुपस्थितीत आम्ही ऋषभ पंतला संधी दिली. त्या सामन्यात ऋषभने चांगली कामगिरी केली. त्यानंतर प्रत्येक सामन्यात ऋषभ पंतच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. मॅक्‍सवेल संघात परतल्यानंतर त्याने सलामीवीर म्हणून त्याने 17, 2 आणि 22 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर त्याने 13 आणि 5 धावा केल्या. पाचव्या स्थानावर त्याने 47, 27, 4, 6 आणि 5 धावा केल्या. एकूणच मॅक्‍सवेलला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)