मॅंचेस्टर युनिटेडसमोर पहिल्या चार संघात टिकून राहण्याचे आव्हान

मॅंचेस्टर: मॅंचेस्टर युनाइटेड क्‍लबचे मुख्य प्रशिक्षक जोजे मोरिनहो यांच्यासमोर युनाइटेड संघाला इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये पहिल्या चार संघात स्थान मिळवून देण्याचे मोठी आव्हान आहे. प्रीमियर लीगमधील पहिले चार संघ चॅम्पियन्स लीगसाठी थेट पात्र ठरतात. त्यामुळे पुढील वर्षी चॅम्पियन्स लीग स्पर्धेत खेळायचे असेल तर मॅंचेस्टर युनिटेडला पहिल्या चार संघात स्थान मिळवणे गरजेचे आहे.

प्रीमियर लीगमधागे सातव्या स्थानावर असलेल्या युनाइटेडचा संघ मागील महिन्यात त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नव्हता. 14व्य स्थावर असलेल्या क्रिस्टल पॅलेस आणि 18 व्या स्थानावर असलेल्या साऊथहॅम्पटन संघाविरुद्ध त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे गुणतक्त्‌यात त्यांची घसरण झाली. त्यातच काही स्टार खेलाडू आणि प्रशिक्षकांची संबंध बिघडत चालल्याने त्याचा संघाच्या कामगिरीवर देखील परिणाम होत आहे. त्यांचा पुढील सामना चौथ्या स्थानावर असलेल्या आर्सेनल संघाविरुद्ध आहे. या सामन्यात विजय मिळवून ते आपले स्थान सुधारू शकतात.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)