मृत सभासदांची शेअर्स ट्रान्सफरची प्रक्रिया जाणीवपूर्वक थांबवली 

माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते यांचा पत्रकार परिषदेत आरोप 

कराड – पारदर्शी कारभाराची स्वप्ने दाखवून कृष्णा कारखान्यावर निवडून आलेल्या सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार सुुरु आहे. कारखान्याच्या तोट्यात असलेल्या इरिगेशन स्कीम नादुरुस्त अवस्थेत अजूनही दुर्लक्षित आहेत. तर काही ठिकाणी स्कीमचे फाटेच बंद आहेत. त्यामुळे सातबारावर चढलेल्या कर्जाचे काय? या प्रश्‍नाचे उत्तर न देता आपले क्षेत्र वगळण्याच्या भूलथापा योजनांचे संचालक देत आहेत. तसेच 2015 पासून आजअखेर मृत सभासदांचे शेअर्स ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया कारखाना प्रशासनाकडून जाणीवपूर्वक थांबवली गेली असल्याचा आरोप कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केला.

डॉ. मोहिते म्हणाले, कृष्णेच्या सत्तेचा वापर करुन शेतकऱ्यांची केवल दिशाभूल करणाच्या उद्योग सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. असाच कारभार राहिला तर लवकरच कृष्णा कारखाना भोसलेंची प्रायव्हेट खाजगी कंपनी होईल. कृष्णा कारखान्याच्या सत्तेवर येताना विद्यमान सत्ताधाऱ्यांनी पारदर्शी कारभार करु, कृष्णेला गतवैभव प्राप्त करुन देऊ अशी सभासदांना दिवास्वप्ने दाखवली होती. मात्र सत्तेवर आल्यावर त्यांनी कराड दक्षिण व कराड उत्तर मधील बहुतांशी सभासदांच्या ऊस नोंदीमध्ये फरक करुन जाणीवपूर्वक ऊसतोड उशिरा देणे, अडचणी आणणे असला उद्योग सुरु केला आहे. चांगला ऊस इतर कारखान्याला देण्याचा उद्योग सुरु केल्याने कृष्णेच्या जीवावर इतर कारखाने मोठे करण्याचे कामही जोमात सुरु आहे.

डॉ. मोहिते पुढे म्हणाले, कारखान्यावर 2010 ते 2015 या कालावधीतील कारभारावरील कलम 83 व 88 अन्वये चालू असलेल्या चौकशीची तपशिलवार माहितीसाठी अर्ज करुनही आम्हाला कारखाना प्रशासनाकडून माहिती मिळालेली नाही. 2015 पासून आजअखेर मृत सभासदांचे शेअर्स ट्रान्सफर अर्ज देण्यासाठी गेलेल्या सभासदांना अजून धोरणात्मक निर्णय झाला नाही, संचालक बोर्डाचा आदेश नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

विद्यमान संचालक मंडळाला यात राजकारण करायचे आहे. त्यामुळे संबंधीत शेअर्स धारकांनी मृत सभासद शेअर ट्रान्सफर करण्यासाठी एक लेखी अर्ज, वारसाच्या नावाचा चालू तारखेचा सातबारा खातेउतारा, वारस नोंदीचा किंवा अन्य वारस नसल्याचा तलाठ्यांचा दाखला, तहसीलदारांचा वारस दाखला, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर शेअर्सवर्ग होणार आहे. त्याचे प्रतिज्ञापत्र, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर वारसांचे संमतीपत्र, सोसायटीचा येणे-देणेबाकीचा दाखला, मृत्युनोंद, इरिगेशन येणेबाकी दाखला, प्रवेश फी व शेअर ट्रान्सफर अर्ज, शेअर सर्टीफीकेट अगर त्याचा दाखला मिळण्यासाठीचा अर्ज ही कागदपत्रे 31 डिसेंबरच्या आत रजिस्टर पोस्टाने कारखान्याचे अध्यक्ष व एम. डीं. च्या नावे पाठवावीत. संबंधीत अर्जांची झेरॉक्‍स व कागदपत्रांची झेरॉक्‍स स्वतःजवळ ठेवावी. त्यानंतरही निर्णय झाला नाही तर त्यांनी ही कागदपत्रे आमच्याकडे द्यावी, आम्ही मृत सभासद शेअर ट्रान्सफरसाठी प्रयत्न करु. असेही डॉ. मोहिते यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)