मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी

भूमिपुत्र शेतकरी संघटना : महसूल विभागाच्या तहसीलदार बडे यांना दिले निवेदन

नगर – शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी मंत्रालयात विष प्राशन करुन, दुर्देवाने उपचारादरम्यान मृत पावलेल्या धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना तत्काळ 25 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी व त्यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या प्रशासकीय यंत्रणेतील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करुन, त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन महसूल विभागाच्या तहसीलदार हेमा बडे यांना देण्यात आले.

-Ads-

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, राज्य प्रवक्ते अनिल देठे, किरण वाबळे, अशोक आंधळे, साईनाथ घोरपडे, संदीप जाधव, राजू जाधव, ज्ञानेश्‍वर गागरे, मोहन मोढवे, संतोष कोरडे आदी उपस्थित होते.

धुळे जिल्ह्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांची औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र, पाच एकर जमिनीच्या मोबदल्यात त्यांना 4 लाख रुपयांचा तोकडा मोबदला देण्यात आला. इतर शेतकऱ्यांपेक्षा जमीनीचा मोबदला कमी मिळाल्याने त्यांनी जमीन अधिग्रहण कायद्यानुसार मोबदला मिळण्यासाठी संबंधित विभाग व मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या. त्यांच्या मागणीची प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने दखल न घेतल्याने त्यांनी दि. 22 जानेवारी रोजी मंत्रालयात जाऊन विष प्राशन करुन, आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला. धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या बळी जाण्यास जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन, त्यांचे निलंबन करावे. तसेच पाटील यांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयाची आर्थिक मदत देऊन, त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला देण्याची भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)