मृत कुत्र्याला वाचवण्याच्या नादात एसटी नाल्यात

चालकाचे प्रसंगावधान; वडूज कान्हरवाडी बसला अपघात

वडूज, दि. 7 (प्रतिनिधी) – वडूज कान्हरवाडी बसला कातरखटाव गावातील जानाई मंदीराजवळ अपघात झाला. दरम्यान, चालकाने प्रसंगावधान राखल्याने पुढील अपघात टळला. वडूज आगाराची
कान्हरवाडीला जाणारी एसटी बस क्रं एम एच 40 8889 कातरखटाव गावातील जानाई मंदीराजवळ आली असता चालकाला रस्त्यावर एक कुत्रा पडलेला दिसला. त्यामुळे त्या कुत्र्याला वाचवण्यासाठी चालकाने बस रस्त्याच्या डाव्या बाजुला घेतली. परंतु, चालाका अंदाज न आल्याने बस नाल्यात गेली. सुदैवाने चालकाने राखलेले प्रसंगावधान व नाल्याशेजारी असलेल्या बांधाला एसटी थटल्याने मोठा अपघात टळला. नाल्याशेजारी असलेल्या बांधावर अडकल्याने बस पलटी झाली नाही. पण गाडी एका बाजूला पुर्ण झुकलेली असल्याने गाडीचा दरवाजा उघडता येत नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांनी संकटकालीन दरवाजातून सर्व विद्यार्थ्यांची सुटका केली. या घटनेमुळे बसमध्ये असलेले शालेय विध्यार्थी व प्रवाशांचा मात्र गोंधळ उडाला. रस्त्यावर पडलेल्या ज्या कुत्र्याला वाचवण्यासाठी चालकाने बस डाव्या बाजूल नेली तो कुत्रा मृत झाल्यानेच रस्त्यावर पडलेला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)