मृत कीर्तनकाराच्या कुटुंबास सांगवी सांडस ग्रामस्थांची मदत

वाघोली- बुलढाणा येथून सप्ताहानिमित्त कीर्तनासाठी सांगवी सांडस येथे आलेल्या तरुणाचा नदीत पडून अपघाती मृत्यू झाला होता. या तरुणाच्या कुटुंबियास सांगवी सांडस ग्रामस्थांच्या वतीने 51 हजारांची आर्थिक मदत करण्यात आली असल्याचे ग्रामस्थ स्वप्नील लोले यांनी सांगितले. दहा दिवसापूर्वी विठ्ठल भावरे या तरुणाच्या मृत्यू प्रकरणी ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त करीत सामाजिक जबाबदारी म्हणून एकत्रितपणे रक्कम गोळा करून बुलढाणा येथील आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते भावरेयांच्या कुटुंबाला देण्यात आली. यावेळी स्वप्नील लोले, दादासाहेब पिंगळे, मधुकर लोले, केशव तळेकर, सचिन लोले, सचिन शितोळे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)