“मृत्युंजय’ योद्धा

मनीषा संदीप

लोकप्रिय अस्मिता पुरवणीची सगळेच आतुरतेने वाट पाहात असतात… तर आपल्या ग्रेट पुस्तकमध्ये आज मी आपणास शिवाजी सावंत यांच्या “मृत्युंजय’ कादंबरीविषयी सांगत आहे. मृत्युंजय योद्धा पण तितकाच उपेक्षित राहिलेला कर्ण… जीवनात दुर्लक्षित राहिलेला कर्ण… कर्ण एक महान पराक्रमी, दानशूर, जन्मजातच कवच कुंडले धारण केलेला योद्धा, पण तरीही त्याच्या नशिबालाही उपेक्षा यावी. अतिशय वाईट वाटते वाचताना. कुंतीपुत्र असूनही सूतपुत्र म्हणून त्याच्या वाट्याला जे जगणे आले ते कोणामुळे? कुंती माता चूक नसतानाही अगदी जन्मत:च त्याला भर पावसात नदीत सोडून देते. पुढे राधामाता त्याला संभाळते. पराक्रमी असूनही त्याच्या गुणांची कदर न होता फक्त सूतपुत्र आहे म्हणून वेळोवेळी हिणवले जाते.

दुर्योधन दुष्ट्‌ होता हे अगदीच खरे आहे स्वार्थासाठी म्हणा किंवा पांडवांना सरस असा कोणी तरी आपल्याकडे असावा म्हणून का होईना त्याने कर्णाला जवळ केले त्याच्या पराक्रमाला शोभेल असे पद देऊन त्याचा सम्मान केला आणि इथेच तो वीर पराक्रमी पुरुष अडकत गेला. काहीही झाले तरी दुर्जनाची संगती न धरावी कधी. कथेमध्ये प्रत्येक पात्र खरे वाटते. कर्ण, वृषाली, शोण, कुंती, दुर्योधन, सगळ्यांबद्दल एक मत तयार होते. ते कायम मनात घर करून राहते. कर्णाचा पराक्रम, दानशूरता, प्रत्येकांच्या भावभावना, मनाची ओढाताण, हळुवार प्रेम साक्षात मृत्यूला थांबवणारी कर्णाची सहनशीलता.. युद्ध प्रसंगाचे तर वर्णन असे आहे की प्रत्यक्ष आपण तिथे आहोत असे वाटते. कर्णाचा मृत्यू जीवाला चटका लावून जातो. अतिशय लोकप्रिय कादंबरी मृत्युंजय नक्की वाचा…आणि स्वतः वाचून अनुभव घ्या…


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)