मृताच्या प्लॉटची परस्पर विक्री ; पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

13 वर्षांनी प्रकार उघडकीस

नगर: मृत व्यक्तीच्या नावे असलेल्या प्लॉट तोतया इसमांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी करून पुन्हा तो प्लॉट विक्री करण्यात आला. बुऱ्हाणनगर येथील हा धक्कादायक प्रकार 13 वर्षांनंतर उघडकीस आला आहे. याप्रकरणी मृताच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून 5 जणांविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बुऱ्हाणनगर येथे छाया सिध्दार्थ आल्हाट (वय 58,रा. नंदनवननगर,सावेडी) यांचे वडिल धनाजी विश्राम भिंगारदिवे यांच्या नावे प्लॉट होता. कर्डिले यांचे स.नं.8/1 मध्ये 213 चौ.कि.मीचा प्लॉट नं.17 हा खरेदीखत दस्त क्रमांक 1771/2005 अन्वये आरोपी प्रकाश कर्डिले याने तोतया इसमांद्वारे खरेदी केल्याचे दाखवून नगरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्रे दाखल केली. कर्डिले याने ओळख म्हणून संघराज शंकरराव कांबळे, सुीष शंकर ढवळे यांनी ओळख दाखवून त्या प्लॉटची जिजाबाई बबन तरटे व हरीभाऊ तुळशीराम ठोंबरे (रा.बुऱ्हाणनगर) यांना खरेदीखत दस्त क्रमांक 3437/2007 द्वारे विक्री करण्यात आला. हा प्रकार बुधवारी उघडकीस आला. तब्बल 13 वर्षांनंतर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी छाया आल्हाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोतया इसम व महिलेसह प्रकाश कुंडलिक कर्डिले (रा.बुऱ्हाणनगर), संघराज शंकरराव कांबळे (रा.बागरोजा हडको), सुभाष शंकर ढवळे (रा. पोखर्डी) यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)