मृताच्या नातेवाईकांची डॉक्‍टरला मारहाण

पिंपरी – डॉक्‍टरांच्या चुकीमुळे तरुण रुग्ण दगवल्याचा आरोप करत नातेवाईकांकडून डॉक्‍टरला मारहाण करण्यात आली. हा प्रकार पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात घडला.

केतन गायकवाड (वय-26, रा. पिंपरी) असे मयत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीतील एका रुग्णालयात केतन यांचा मृत्यू झाला. चालत्या-बोलत्या केतनचा अचानक मृत्यू झाल्याबद्दल नातेवाईकांनी डॉक्‍टरकडे विचारणा केली. मात्र, या डॉक्‍टरने समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे मयताच्या नातेवाईक महिला परिचारिकाने डॉक्‍टरने काय उपचार केले हे पाहण्यासाठी कागदपत्र बघण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी एका डॉक्‍टरने त्या महिलेचा हात पिरगळला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्‍टरला मारहाण केली. याबाबत नातेवाईक अथवा डॉक्‍टर यांच्याकडून कोणतीही तक्रार आली नसल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)