मृगाचे मखमली किडे दिसू लागले

राजगुरूनगर – तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात वळवाचा पाऊस पडताच मृगाचे किडे (मखमली किडे) बाहेर पडले आहेत. मृग नक्षत्र सुरू झाले की, हे गर्द लाल रंगाचे किडे बाहेर पडतात. या किड्यांचे आयुष्य काही दिवसांपुरतेच असते. डोंगराळ भागात या किड्यांची संख्या जास्त आहे. अनेक शेतकरी या किड्यांचे रक्षण करतात. ज्यावर्षी हे किडे जास्त प्रमाणात असतात त्यावर्षी पाऊस मुबलक पडतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

यावर्षी मोसमी पाऊस उशिराने सुरू झाला असला तरी वळवाचा पाऊस गेली तीन दिवसांपासून पडत असल्याने मृग नक्षत्राचे किडे (लाल मखमली किडे) अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. मृग नक्षत्रातील हे किडे पाहण्याचा अनेकजण आनंद घेत आहेत. मात्र ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या किड्याचे आयुष्य किती याबाबत माहिती उपलब्ध होत नाही; मात्र आठ ते पंधरा दिवसांत दिसणारे हे किडे सर्वांचेच आकर्षण आहे.

वेगवेगळ्या नावाने ओळख
मृग नक्षत्रातच हा किडा दिसतो म्हणून याला मृगाचा किडा म्हणतात. यावरूनच त्याला तेलगुत आरुद्रा (नक्षत्र) पुरुगू म्हणतात. संस्कृत मधे बिरबाहुती, तर उर्दूत राणी किडा म्हणतात. मराठीत मखमली किडा, गोसावी किडा (त्याच्या शरीरावरील भगवी झाकं असलेल्या मखमलीमुळे) या नावाने ओळखतात. इंग्रजीत Red Velvet Mite आणि शास्त्रीय भाषेत Holostric या नावाने हा ओळखला जातो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)