मूळ प्रमाणपत्रे महाविद्यायलाला द्यायला नकोत

संग्रहित छायाचित्र

केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचा महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली – आता कोणत्याही विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रवेश घेताना मूळ प्रमाणपत्रे द्यावी लागणार नाहीत. याशिवाय यापुढे महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रे स्वत:कडे ठेवता येणार नाहीत. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बदलल्यास त्यांना शुल्कदेखील परत मिळणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

-Ads-

आतापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देताना महाविद्यालयांकडून त्यांची मूळ प्रमाणपत्रे घेतली जायची. यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यावर ही प्रमाणपत्रे महाविद्यालयाकडे जमा करावी लागायची. मात्र यापुढे महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना स्वयम साक्षांकित (सेल्फ अटेस्टेड सर्टिफिकेट) प्रमाणपत्रे द्यावी लागतील. ही प्रमाणपत्रं महाविद्यालयांकडून मूळ सोबत पडताळून पाहिली जातील. यानंतर महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना मूळ प्रमाणपत्रं परत करावी लागतील. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे यासंबंधी अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जावडेकर यांनी दिली. जर विद्यार्थ्याने एखाद्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द करुन दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेतला, तर महाविद्यालयाला त्याने भरलेले शुल्क परत करावे लागेल, अशी महत्त्वपूर्ण माहिती जावडेकर यांनी दिली.

प्रवेश प्रक्रिया बंद होण्याच्या 16 दिवस अगोदर प्रवेश रद्द केल्यास 100 टक्के शुल्क परत मिळेल. तर प्रकिया बंद होण्याच्या 15 दिवस आधी प्रवेश रद्द केल्यास 90 टक्के शुल्क परत केलं जाईल. प्रवेश घेतल्यानंतर महिन्याभरात तो रद्द केल्यास 50 टक्के शुल्क परत मिळेल. या नियमांचं पालन न केल्यास महाविद्यालयांना दंड ठोठावला जाईल, अशी माहिती जावडेकर यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)