मूल्यांकन चुकांबाबत सीबीएसई बोर्डाची 130 शिक्षकांविरुद्ध कारवाई

नवी दिल्ली – मूल्यांक़न चुकांसाठी सीबीएसई बोर्डाने देशातील 130 शिक्षकांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. इयत्ता 10वी आणि 12 च्या उत्तर पत्रिका तपासणीतील चुकांसाठी बोर्डाने शिक्षकांविरुद्ध ही कारवाई सुरू केली आहे. उत्तर पत्रिका तपासणीतीला मूल्यांकन चुकांसाठी इतर विभागातील शिक्षकांविरुद्धही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. इयत्ता 10वी आणि 12 चे निकाल जाहीर झाल्यानंतर गुणांमधील चुकांबाबत मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला होता.

बोर्डाने या वर्षी प्रथमच पुनर्मुल्यांकन सुविधा सुरू केली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक मिळालेल्या गुणांबद्दल तक्रार असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले. पुनर्मूल्यांकनात काही विद्यार्थ्यांना पूर्वीच्या गुणांपेक्षा 50-55 गुंण अधिक मिळाल्याचे आढळून आले असून या बाबतीत तपशीलवार अहवाल तयार करण्यात येत असल्याची माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पेपर तपासणीत चुका करणाऱ्या 130 शिक्षकांपैकी सर्वाधिक 45 शिक्षक पाटण्यातील आहेत. शिक्षकांच्या या बेजबाबदार पणामुळे बोर्डाची प्रतिमा मलीन झाल्याचे आणि विद्यार्थी आणि पालक यांना प्रचंड मनस्ताप झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, ओळख पटलेल्या 27 शिक्षकांविरुद्ध निलंबनासह आवश्‍यक कारवाई करण्याचे आदेश संबधित शाळांना सीबीएसईच्या डेहराडून कार्यालयाने दिलेले आहेत.

अशाच प्रकारची कारवाई चेन्नईतील 14, अलाहाबादमधील 11, भुवनेश्‍वरमधील 7, दिल्लीतील 6, गुवाहातीतील 2,त्रिवेंद्रममधील 1 आणि अजमेर व पंचकुला येथील प्रत्येकी 8 शिक्षकांविरुद्ध करण्यात येणार आहे. दिल्लीतील सरकारी शाळांतील 3 आणि खासगी शाळांतील 2 अशा 5 शिक्षकांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. संबधित शाळांना तसे आदेश देण्यात आलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)