मूक-बधीर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आनंदी फाउंडेशनची स्थापना

वडगाव मावळ, (वार्ताहर) – माळीनगर येथे मूक-बधीर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर रविवार दि. 18 रोजी आनंदी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. त्याचे उद्‌घाटन उपसरपंच संभाजी म्हाळसकर यांच्या हस्ते झाले.

सोमनाथ शिंदे, मोहिनी निकम, जितेंद्र कोल्हे, भाग्यश्री शिंदे, परिक्षित भालेराव, संतोष जांभुळकर, मनाली लोखंडे यावेळी उपस्थित होते. उपसरपंच म्हाळसकर म्हणाले, मूक-बधीर विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासासाठी अपंग कल्याणकारी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेऊ. माया इव्हेंट्‌स वाशीम यांनी मुलांना बलून डेकोरेशनचे वर्कशॉप घेतले. आनंदी व उत्साही वातावरणात आनंदी फाउंडेशनचा कार्यक्रम झाला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)