मूक अभिनय आणि नृत्यातून मनोरुग्णांनी दिला सामाजिक संदेश

पुणे – मूक अभिनयातून निर्भीडपणे आपले विचार मांडत महिला अत्याचाराविरूध्द सादर केलेली मूक नाटिका, हिंदी चित्रपटातील विविध गाण्यावर सादर केलेले सामूहिक नृत्य, मराठी हिंदी गीतांच्या सादरीकरणातून मनसोक्त आनंद घेत मनोरुग्णांनी आत्मविश्वासाने आपल्या कलागुणांचे सादरीकरण उपस्थितांसमोर केले. मनावर कोणतेही दडपण न ठेवता आपले विविध कलागुण सादरकरीत मनोरुग्णांचा अनोखा सांस्कृतिक मेळावा येरवडा मनोरुग्णालयात रंगला.
प्रतिती सेंटर फॉर मेन्टल हेल्थ आणि प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरुग्णांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या डॉ. मधुमिता बहाले, संस्थेच्या संचालिका सुषुप्ती साठे, मुक्ता चैतन्य, स्मिता नवगिरे आदी उपस्थित होत्या. यावेळी मुक्ता चैतन्य यांनी महिला सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. सुषुप्ती साठे म्हणाल्या, मनोरुग्णांना आपली कला व्यासपीठावर मांडता यावी तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजात मनोरुग्णांबद्दल अनेक नकारात्मक समज आहेत, असे समज दूर करण्यासाठी आणि मानसिक आजारांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी संस्था काम करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)