मूकबधीर विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निषेध

वडगाव मावळ – पुणे येथील समाज कल्याण आयुक्‍त कार्यालयावर हजारो मूकबधीर विद्यार्थी युवक शिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या या मागणीसाठी आंदोलन करीत होते. त्यावेळी आंदोलन मोडीत काढण्याच्या हेतूने पोलिसांनी उपेक्षित वर्गाच्या तरुणांवर अमानुष लाठीमार केल्यामुळे अनेक मूकबधीर आंदोलक जखमी झाले आहेत.

या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी त्वरित राजीनामा देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि. 26) निषेध मोर्चा काढून भाजप सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा देत मावळ तहसीलदार यांना निवेदन दिले.

निवेदन नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांनी स्वीकारले. या वेळी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष पै. सचिन घोटकुले, युवक तालुकाध्यक्ष कैलास गायकवाड, सुनील दाभाडे, सरपंच दत्ता पडवळ, आशिष खांडगे, सचिन भंबक, चंद्रशेखर परचंड, सोमनाथ गायकवाड, विठ्ठल जाधव, कैलास खाडंभोर, नवनाथ पडवळ, वैभव नवघणे, नवनाथ जाधव, अफताब सय्यद, विलास शिंदे, कैलास आडकर, सोमनाथ केदारी, अक्षय नवघणे आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)