मुहमे युती..

सातारा  -सातारा जिल्ह्यात दोन्ही निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सगळे राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. मुख्यमंत्री एकीकडे युती होणार असे जाहीर सांगत असताना सातारा जिल्ह्यात शिवसेनेच्या मतदार संघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जाहीर करण्याचा सपाटा पश्‍चिम महाराष्ट्राचे आघाडीचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी लावला आहे. जाहीर सभांमधून युतीची भाषा करणारे हे नेते युतीची नाती तोडण्याच्या मनस्थीतीत आहेत का असा प्रश्‍न निर्माण होतो.

गेल्या वर्षा पासून भारतीय जनता पक्षाने सातारा जिल्ह्यात आपला प्रभाव वाढवण्यास प्रारंभ केला आहे. सातारा नगर पालिकेसह , जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि अगदी ग्रामपंचायतीत कमळ चिन्ह दिसलेच पाहिजे या संकल्पाने या निवडणुका लढल्या . भारतीय जनता पक्षाचा खडखडाट असणारा हा जिल्हा आता भाजपच्या हवेने बहरला आहे. नगराध्यक्ष, नगर सेवक, ग्रामपंचायतीत यश विमळवत आता त्यांनी जिल्ह्यात किमान तीन आमदार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. यासाठी मेळावे , सभा आणि शक्‍य तिथे भाजपच्या संभाव्य उमेदवारांना प्रकाशात आणण्याचे काम सुरु आहे.

-Ads-

कराड येथे डॉ.अतुल भोसले, मनोज घोरपडे आणि कोरेगावात महेश शिंदे यांना संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आणण्याचे काम सुरु झाले आहे. भव्य मेळावे आणि सभांमधून सार्वजनिक कामांचा शुभारंभ करताना ना. चंद्रकांत पाटील कॉंग्रेस , राष्ट्रवादीवर निशाणा साधत आहेत. एकेकटे उभे रहाण्याची ताकद आहे का असा प्रश्‍न करत आघाडीच्या दोन्ही पक्षांना लढण्याचे जाहीर आव्हान देत आहेत. दुसरीकडे राज्य पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीरपणे शिवसेना प्रमूख उध्दव ठाकरे यांच्याशी समजुतदारपणा दाखवत आगामी निवडणुकीत युती असेल असे सांगत आहेत. शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवायचा आणि कामाला लागालयचे असे वातावरण निर्माण केले जात असताना सातारा जिल्ह्यात मात्र युती असताना शिवसेनेच्या ज्या जागा आहेत त्याच जागांवर ना.चंद्रकांत पाटील भाजपचे उमेदवार घोषित करत आहेत. कोरेगावची जागा शिवसेनेची आहे तिथे महेश शिंदे , तर जराड उत्तरेत सेनेच्या जागेवर मनोज घोरपडे यांची उमेदवारी जाहीर करून युतीच्या घोषणेला डांबर फासण्याचा उद्योग सुरु केला आहे. एकीकडे राष्ट्रवादीकडून आयात केलेल्या मंडळींना पक्षात मानाचे स्थान , झालेल्या निवडणुकांमध्ये उमेदवारी देत भाजप आपला प्रभाव वाढवत असताना दुसरीकडे शिवसेनेची कोंडी करण्याचा ही प्रयत्न करत आहे.

जिहे कठापूर योजनेला नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरु स्व.लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. सांगली जिल्ह्यातले कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष संजयकाका पाटील यांचे नाव व छायाचित्र फलकांवर होते मात्र शिवसेनेचे जिल्ह्यातील याच महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांना हा कार्यक्रमात जागा नव्हती. यापुढे जाऊन ज्या जिहे कटापूर योजनेला स्व.इनामदार यांचे नाव देण्याचा घाट भाजपच्या दादांनी घातला त्याच योजनेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव यापूर्वी शिवसेनेने दिला आहे. एकीकडे युतीची भाषा करताना वर्तनातून शिवसेनेला शह आणि मात देण्याचा हा प्रकार दोस्त दोस्त ना रहा सारखाच आहे.

भाजप, शिवसेनेने सातारा जिल्ह्यात आपला झेंडा कोणत्या ही परिस्थीतीत रोवायचा आणि राष्ट्रवादी,कॉंग्रेसच्या उमेदवारांना पळता भूई कराण्याचे नियोजन जोरात केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)