मुस्लीम समाजातील मुलाणी यांच्या चाळीसाव्यानिमित्त कीर्तन

मंचर- वळती (ता. आंबेगाव) येथील मुस्लिम समाजातील अब्दुल करीम धोंडूभाई मुलाणी यांनी आयुष्यभर हिंदू देव-देवतांची भजने गायली. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या चाळीसाव्यानिमित्त चक्क किर्तनाचे आयोजन करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला हिंदू-मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अब्दुल करीम मुलाणी यांच्या चाळीसाव्यानिमित्त वळती गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरासमोरिल सभामंडपात ह. भ. प. साई ताजोद्दीन महाराज यांचे सकाळी कीर्तन झाले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, प्रताप वळसे पाटील, शरद बॅंकेचे उपाध्यक्ष शिवाजी लोंढे, संचालक पांडुरंग पवार व याकुब मुलाणी आदी हिंदू-मुस्लिम समाजातील बांधव उपस्थित होते. शरद बॅंकेचे उपाध्यक्ष शिवाजी लोंढे म्हणाले की, अब्दुलभाई मुलाणी हे वळती गावाप्रमाणेच परिसरातील गावांचे लाडके होते. आयुष्यभर अभंग, गौळणी गायनाचे काम त्यांनी केले. स्वतः मुस्लिम असूनही हिंदूंच्या प्रत्येक लहान-मोठ्या धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. त्यांनी कोणालाही दुखावले नाही.
ह. भ. प. साई ताजोद्दीन महाराज म्हणाले की, एका मुस्लिम बांधवाच्या चाळीसाव्यानिमित्त चक्क किर्तनाचा कार्यक्रम राज्यात प्रथमच होत आहे. मुलाणी कुटुंबाला संपूर्ण वळती गावाची मिळत असलेली साथ मोलाची आहे. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतांमधून अब्दुलभाईंच्या आठवणींना उजाळा दिला. आभार ग्रामपंचायत सदस्या रुबिना मुलाणी यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)