मुस्लीम समाजाचा कामशेतमध्ये मूकमोर्चा

कामशेत (वार्ताहर) – जम्मू-काश्‍मीरच्या कठुआ जिल्ह्यात 10 जानेवारी रोजी आठ वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ आरोपींवर पोलिसांनी व शासनाने कठोर कारवाई करावी तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयामार्फत हाताळले जावे. तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे या मागणीसाठी कामशेतमध्ये मुस्लीम व हिंदू दोन्ही धर्मियांच्या वतीने संयुक्‍तपणे मूक मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाचे आयोजन जमीर सय्यद, हसीना मुलानी, अयाज शेख व प्रशांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. या वेळी मुस्लीम समाजाच्या महिला मुलींसह सर्वधर्मिय सहभागी झाले.

या वेळी कामशेतमधून पंडित नेहरू विद्यालय रेल्वे स्टेशन ते सहारा कॉलनी ते पोलीस ठाणे असा मूक मोर्चा काढण्यात आला. या वेळी मुस्लीम नागरिकांसह कामशेतकर नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांची संख्या लक्षणीय होती. शैला दळवी, उज्वला वाघवले, बायडाबाई खंडागळे, जुबेर शेख आदींसह अफिफा, मिसबा, सना या तीन लहान मुलीनीही या मूक मोर्चात सहभाग घेतला होता.

कामशेत पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार विजय धेंडे व राम कानगुडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी तानाजी दाभाडे, अशोक गायकवाड, उज्वला वाघवले व जमीर शेख यांनी आपली मनोगते व्यक्‍त केली. हा मूक मोर्चा शांततेत पार पडला. “हमे इंसाफ चाहिये’, असे म्हणत मोर्चाचा समारोप झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)