मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती

पुणे – मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे या इतर मागण्यासाठी रविवारी मुस्लीम समाजाच्या वतीने पुण्यात विराट मुकमोर्चा काढण्यात आला. यामुळे लष्कर आणि विभागीय कार्यालयासमोरील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते.
गोळीबार मैदानापासून सुरू झालेला मोर्चाची कॉन्सिल हॉल येथे सांगता झाली. हजारोंच्या संख्येन मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. मुली आणि महिलांची संख्या जास्त होती.

मोर्चात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागांतील मुस्लीम बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. हातात तिरंगा आणि फलक घेऊन समाजबांधव सहभागी झाले होते. या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक इतर मार्गांवर वळविण्यात आली होती. तर, काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले होते. सोलापूर रस्ता, स्वारगेट ते भैरोबानाला दरम्यान कोंढव्याकडून गोळीबार मैदानाकडे येणारा रस्ता, लुल्लानगर तर नेहरु रस्ता ते ढोले- पाटील चौकातून मालधक्‍यापर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

दरम्यान, विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे. मुस्लीम आरक्षण तत्काळ लागू करा, याबरोबरच अनुसूचित जाती व मुस्लीम समाजावरील अन्यायाच्या घटना थांबवा, मॉब लिचिंग घटनेतील आरोपींना फाशी द्या, मुस्लीम विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह देण्यात यावी, मुस्लीम वक्‍फ बोर्डाच्या जमिनींवरील अतिक्रमण थांबवा, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटींची तरतूद करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)