मुस्लीम महिलांना नकोय धर्मात हस्तक्षेप?

  पत्रसंवाद

बिहारात केवळ दोन मुस्लीमबहुल मतदारसंघातील एकगठ्ठा आणि मोठ्या संख्येने झालेल्या मतदानामुळे आरजेडीचा उमेदवार 61796 मताधिक्‍याने विजयी झाला. थोड्याबहुत फरकाने असेच गोरखपूर व फुलपूरमध्येही झाले असावे. यावरून काही निष्कर्ष काढता येतात. बिहारमधील लोक, विशेषतः मुस्लीम भ्रष्टाचाराला महत्त्व देत नाहीत. भाजपाला हरविणे याच उद्देशाने मोठ्या संख्येने व एक गठ्ठा मतदान केले असावे. त्यामुळेच राजकीय पक्ष मुस्लीम समाजाचा अनुनय करतात.

तोंडी तलाकविरोधी कायदा मुस्लीम महिलांवरील अन्याय होऊ नये म्हणून आणला असला तरीही अगदी मुस्लीम महिलांनाही धर्मातील हा हस्तक्षेप मान्य नाही. आर्थिक व सामाजिक सुधारणा कठोरपणे अंमलात आणणे मोदींना नुकसानीचे ठरते आहे. नोटाबंदी व जीएसटीने भाजपाचा पारंपरिक मतदार नाराज झाला असून कमी मतदान व नोटाचा वापर करून त्याने नाराजी दाखवून दिली आहे. मोदींना त्यावर उपाय शोधावे लागतील.

ही निवडणूक नितीशकुमारांचा जेडीयू एनडीएमध्ये आल्यावर होऊनही भाजपाला हार पत्करावी लागली आहे. अगदी या निवडणुकांतील भाजपचा पराभव म्हणजे केंद्रातली सत्ता गेली, असा त्याचा अर्थ न होता, एकप्रकारे ही भाजपाला एक चेतावनीच आहे, असे म्हणता येऊ शकेल. पक्षाच्या धुरिणांनी इथून पुढे सामान्य माणसाला केंद्र पकडून विकासाची प्रक्रिया राबवणे गरजेचे आहे. अन्यथा देशाचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. मग पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसलाही नावे कोणालाच, कधीच ठेवता येणार नाहीत, हे नक्की.

– हर्षल जाधव, पानमळा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)