मुस्लीमांशी दंगल घडविण्याचे होते कटकारस्थान 

बुलंदशहर हत्याकांड प्रकरण : शिरोडकर चौकशी अहवाल सादर

बुलंदशहर – बुलंदशहर येथे गोहत्येवरून झालेला हिंसाचारात मोठे कटकारस्थान असून त्यात मुस्लीम समाजाशी दंगा घडवण्याचा एक प्रयत्न होता, असे तपासात उघडकीस आले आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. बी. शिरोडकर यांनी केलेल्या चौकशी अहवालातून ही बाबी समोर आल्याचे वृत्त आहे. हा अहवाल उत्तर प्रदेशच्या पोलिस महासंचालकांना सादर करण्यात आला असून तो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देण्यात येणार आहे.

याबाबत एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, हा हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग होता, हे सिद्ध करणारा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे गायीचा सांगाडा हा 48 तास जुना होता, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा सांगाडा सगळ्या हिंसाचाराचे मूळ होता. ज्यात एका पोलीस अधिकाऱ्याने व एका तरूणाने प्राण गमावले. बजरंग दलाचे जिल्हा प्रमुख योगेश राज यांनी गोहत्या सयाना गावात झाल्याचे सांगितले असले तरी तशी शक्‍यता कमी आहे.

योगेश राज यांनी आपण गोहत्या होताना बघितल्याची जबानी दिली आहे. जमावाचे वागणेही हे सूचित करत होते की काहीजण परिस्थिती चिघळावी व हिंसाचार व्हावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत होते, असेही अहवालात नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)