मुस्लिम समाजाला न्याय जरूर मिळेल ! -मुख्यमंत्री

मुंबई – भाजपचे सरकार आल्यानंतर मुस्लिम समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी दुप्पट निधी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. भारतीय राज्य घटनेनुसार धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, असे सूचित करताना, मुस्लिम समाजातील ज्या जातींचा अनुसूचित जाती-जमातीत समावेश आहे त्यांचे आरक्षण पुढेही सुरू राहील याची ग्वाही त्यांनी दिली.

सरकारने खाजगी शिक्षण संस्थांमधील अल्पसंख्यांक समाजातील विद्याथ्रयांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे जे आवश्‍यक आहे ते सर्व केले जाईल, अशी हमी त्यांनी दिली. या सरकारच्या 5 वर्षांचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर मुस्लिम समाजाला कांग्रेस राष्ट्रवादीकडे जाण्याची गरज भासणार नाही इतका विश्वास राज्यातील भाजपा शिवसेनेचे सरकार अल्पसंख्यांक समाजांमध्ये नक्कीच निर्माण करेल असे सांगताना, अधिवेशन संपल्यानंतर मुस्लिम समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदारांची एक महिन्यात बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)