मुस्लिम लीगचा आमदार ठरला अपात्र 

कोची – केरळातील मुस्लिम लीगच्या आमदाराला निवडणूक प्रचार काळात धर्माचा वापर केल्याबद्दल अपात्र ठरवण्याचा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. के. एम. शाजी असे या आमदाराचे नाव आहे. ते कोझीकोडे मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. या निकालानुसार केरळ विधानसभेच्या सभापतींनी आणि निवडणूक आयोगाने योग्य ती कार्यवाही करावी अशी सुचनाही उच्च न्यायालयाने केली आहे. त्यावेळी त्यांच्या विरोधात निवडणूक लढणारे डाव्या आघाडीचे उमेदवार एम. व्ही निलेशकुमार यांनी त्यांच्या निवडीला आव्हान दिले होते.

या निवडणूकीत शाजी हे 2287 मतांनी निवडून आले आहेत पण त्यांनी हा विजय भ्रष्ट आणि गैरमार्गाने मिळवलेला आहे असा आरोप निलेशकुमार यांनी आपल्या याचिकेत केला होता. त्यांनी मुस्लिम मतदारांना धर्माच्या आधारे मतदान करण्याच आवाहन केले होते व त्याचे पुरावे निलेशकुमार यांनी कोर्टात सादर केले होते. जे इस्लामवर विश्‍वास ठेवत नाहींत अशा उमेदवारांना मतदान करू नका असे आवाहन करणारे शाजी यांचे निवडणूक प्रचार पत्रकही त्यांनी कोर्टात सादर केले होते. या निकालाला आव्हान देणारी याचिका सादर केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)